डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा जलसंवर्धनासाठी बंधारे बांधणे उपक्रम कौतुकास्पद : नगराध्यक्ष उमेश सकपाळ


श्री सदस्यांनी बांधले दोन ठिकाणी बंधारे

चिपळूण (ओंकार रेळेकर): जलसंवर्धनासाठी डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविण्यात येणारा बंधारे बांधण्याचा उपक्रम कौतुकास्पद असून,यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे, अशी प्रतिक्रिया चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रात दुष्काळाचा सावट पसरला असताना आपल्याला सदगुंरूंकडून आदन्या आल्यानंतर डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने बंधारा बांधला आहे ती अत्यंत महत्वाची गोष्ट केली आहात याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो अशा शब्दात नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
जलसंधारणाचे महत्त्व लक्षात घेऊन पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा उपयोग उन्हाळ्यात व्हावा, या उद्देशाने डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, ता. अलिबाग, जि. रायगड यांच्या सौजन्याने खेंड आणि शिवनदी येथे वनराई बंधारा बांधकाम उपक्रम राबविण्यात आला.
चिपळूण शहरातील शिवनदी येथे रविवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी सद्गुरूंच्या आदनेतून श्री सदस्यांनी दोन बंधारे बांधण्याचा उपक्रम राबविला. या उपक्रमात ११० श्री सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सकाळी ६.३० ते ११ वाजेपर्यंत हा उपक्रम सुरू होता.या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमात नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्यासह नगरसेवकांनीही प्रत्यक्ष सहभाग घेतला.पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे,भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे आणि जलसंधारणाला हातभार लावणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.श्री सदस्यांनी सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या या उपक्रमाचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ आणि उपस्थित नगरसेवक यांनी विशेष कौतुक केले.