ऍड महेश मोहितेंनी विहिरीची पाहणी केल्याने ग्रामस्थांना दिलासा 


अलिबाग रायगड: अलिबाग तालुक्यातील साळाव आणि ताडगाव गावातील विहिरींमध्ये एका भोंदू बाबाने जडी बुटी टाकल्याचा प्रताप ११ मे रोजी रात्रीच्या सुमारास घडला होता.या प्रकारानंतर गावकऱ्यांनी थेट रेवदंडा पोलीस ठाणे गाठले होते.रेवदंडा पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले असून पुढील चौकशी सुरु आहे.मात्र ज्या विहिरीत ही जडीबुटी टाकली त्या विहिरीचे पाणी पिण्यास या व्यक्तीने नकार दिल्याने गावकऱ्यांना विहिरीत विष टाकल्याचा संशय आला या सर्व युद्धजन्य परिस्थितीत गावातील ग्रामस्थांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता.खूप मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण झाले होते.त्यानंतर गावातील ग्रामस्थांनी या विहिरीचे पाणी पिण्यास नकार दिला घडलेल्या प्रकारानंतर ऍड महेश मोहिते यांनी ग्रामस्थांसमवेत जाऊन विहिरीची पाहणी केली विहिरीमध्ये पडलेली घाण पंपाच्या साहाय्याने बाहेर काढली तसेच भोंदू बाबांच्या सांगण्यावरून टाकलेल्या विटा देखील बाहेर काढण्यात आल्या साळाव आणि ताडगाव या गावात पाण्याची कमतरता झालेली होती. ती देखील टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा करून ग्रामस्थांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.रेवदंडा पोलिसांनी तात्काळ गुन्ह्याची सखोल चौकशी करून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.सदर तिन्ही आरोपींवर गुन्हे दाखल केले असून रेवदंडा पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.पोलिसांनी तात्काळ केलेल्या कारवाईमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.यापुढे असा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सतर्क राहण्याचे आवाहन ऍड महेश मोहिते यांनी केली आहे.