‘साहित्य विश्व’ दिवाळी अंकाच्या १७ व्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न


साहित्यप्रेमी, मान्यवर आणि विविध क्षेत्रांतील दिग्गजांची उपस्थिती; तुषार रेस्टहाऊस येथे कार्यक्रमाचे आयोजन

अलिबाग (प्रतिनिधी) : साहित्य, संस्कृती आणि वैचारिक विचारांचा संगम घडविणाऱ्या ‘साहित्य विश्व’ दिवाळी अंकाच्या १७ व्या अंकाचा प्रकाशन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या प्रकाशन सोहळ्याला आमदार महेंद्र दळवी, माजी नगराध्यक्ष तथा बांधकाम सभापती प्रशांत नाईक, ॲड. प्रसाद पाटील, आस्वाद पाटील, नगरसेवक ॲड. अंकित बंगेरा, निवृत्त आयएएस अधिकारी दिलीप पांढरपट्टे, अनंत गोंधळी आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच ‘साहित्य विश्व’च्या संपादिका प्रमिला जोशी, महेश कवळे, रिलायन्स समूहाचे रमेश धनवडे, व्यवस्थापक धीरज जोशी, डॉ. मेघा घाटे, पत्रकार धनंजय कवठेकर, ॲड. जय जोशी, संदेश लाते, समाजसेविका जीविता पाटील, कुलकर्णी मॅडम यांच्यासह साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या सोहळ्यात सहभाग घेतला.

दिवाळी अंक हे मराठी साहित्यविश्वातील एक महत्त्वाचे सांस्कृतिक व्यासपीठ मानले जाते. कथा, कविता, लेख, वैचारिक मांडणी आणि सामाजिक विषयांच्या माध्यमातून वाचकांना वैचारिक मेजवानी देण्याचे काम दिवाळी अंक करत असतात. ‘साहित्य विश्व’ने गेल्या १७ वर्षांपासून ही साहित्यिक परंपरा सातत्याने जपली आहे. नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच वाचक आणि साहित्य यांच्यातील नाते अधिक दृढ करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या अंकाच्या माध्यमातून होत आहे.

मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या प्रकाशन सोहळ्याने साहित्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केले. तुषार रेस्टहाऊस येथे आयोजित हा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि यशस्वी वातावरणात संपन्न झाला.