अलिबाग (प्रतिनिधी): “काम बोलतंय” या तत्त्वावर गेल्या दहा वर्षांपासून अविरतपणे जनतेच्या सेवेत कार्यरत असलेल्या लोकनेत्या चित्रा पाटील यांनी पुन्हा एकदा आपला विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. सलग दोन वेळा जनतेने दिलेला कौल ही केवळ राजकीय यशाची नव्हे, तर केलेल्या कामाची पोचपावती असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
“निवडणूक येवो वा न येवो, मी कायम जनतेच्याच सेवेत आहे,” असे सांगत त्यांनी विरोधकांवर सूचक टोला लगावला. विकासकामे, पायाभूत सुविधा, महिला-सक्षमीकरण, युवकांसाठी संधी आणि सामाजिक न्याय या सर्व आघाड्यांवर केलेल्या कामामुळेच जनतेचा विश्वास आपल्यावर कायम असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, पंडितशेट यांची उपस्थिती आणि पाठिंबा यामुळे मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून संघटन अधिक मजबूत होत असल्याचे चित्र आहे.
मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे दुसरे नाव म्हणून चित्रा पाटील यांची ओळख निर्माण झाली असून, विकासकामांची ही घोडदौड पुढेही अशीच सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जनतेचा विश्वास आणि कामाची ताकद हीच आपली खरी भांडवलं असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









