नशामुक्त भारत अभियान जनजागृती मोहिम अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स


अलिबाग (प्रतिनिधी): दि. १३.०२.२०२६ रोजी चिंतामणराव केळकर विदयालयात नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत जन जागृती मोहिम राबविण्यात आली. सदर कार्यक्रमात पोलीस अधिक्षक श्री. नरे सर व श्री. सुहास तावडे सर यांनी नशामुक्तीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. अंमली पदार्थाच सेवन मानवी जीवनात कसे घातक आहे याबाबत माहिती दिली. अंमली पदार्थ सेवन करण्याची कारणे ज्याचे होणारे दुष्परिणाम विदयाथ्याना पटवून दिले.
अंमली पदार्थ सेवन करणाच्या व्यक्तीची लक्षणे स्पष्ट करून सदर व्यक्तीबाबत माहिती देण्यास विदयाथ्याना सुचित केले. कार्यक्रमाची सांगता भारताला नशामुक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून शपथ बोलून घेतली.