मुंबई (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत भारताने आत्मनिर्भरतेकडे मोठी वाटचाल केली असून देशाची अर्थव्यवस्था आणि विकासाला नवी दिशा मिळाल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ८ या विशेष स्मरणांकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार योगेश सागर आदी उपस्थित होते. फडणवीस यांनी मोदी सरकारच्या काळात गरिबांसाठी घरे, शौचालये आणि विविध कल्याणकारी योजनांमुळे मोठा बदल घडल्याचे सांगितले. तसेच भारताची जीडीपी मोठ्या प्रमाणात वाढून देश जागतिक पातळीवर सक्षम अर्थव्यवस्था म्हणून पुढे आल्याचेही त्यांनी नमूद केले.






