पीएनपीत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा


अलिबाग(प्रतिनिधी): प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी वेश्वी संकुल अलिबाग येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

भारत स्वाभिमान ट्रस्ट रायगड व पतंजली योग समिती अलिबाग यांच्या वतीने दिलीप रामभाऊ गाटे भारत स्वाभिमान न्यास सह कोषाध्यक्ष महाराष्ट्र पश्चिम, दिपक दिलीप गाटे युवा भारत प्रभारी जिल्हा रायगड, ज्ञानेश्वर पाटील कोषाध्यक्ष भारत स्वाभिमान न्यास जिल्हा रायगड तसेच कांचन ज्ञानेश्वर पाटील सहयोग शिक्षीका यांनी योग प्रशिक्षण व प्रात्यक्षिक सादरीकरण केले व त्याचे महत्व पटवून दिले.

यावेळी कार्यक्रमास पी.एन.पी.कॉलेजचे संचालक विक्रांत वार्डे,  प्रशासकीय सल्लागार गबाजी गीते, वरिष्ठ महाविद्यालय प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य रवींद्र पाटील, उपप्राचार्य प्रा. निशिकांत कोळसे,  क्रीडा प्रशिक्षक प्रा. तेजस म्हात्रे  होली चाईल्ड सी.बी.एस.ई. स्कुलच्या मुख्याध्यापिका वेल्लईम्मल्ल वेणी, होली चाईल्ड स्टेट बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवलेआदी मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएस विभाग प्रमुख प्रा. दिनेश पाटील यांनी केले.