मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमळीत भव्य मोफत नेत्रतपासणी शिबिर


मुरुड (प्रतिनिधी): महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुरुड तालुक्यातील आमळी येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य मोफत नेत्रतपासणी, नेत्रशस्त्रक्रिया व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

भाजप दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस अँड महेश मोहिते आणि भाजप महिला जिल्हा उपाध्यक्षा अँड. मनस्वी मोहिते यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेले हे शिबिर आमळी येथील एच. पी. पेट्रोल पंपाजवळील भाजप कार्यालयात पार पडले. शिबिराचे उद्घाटन अँड. महेश मोहिते आणि अँड. मनस्वी मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिरामध्ये शेकडो नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून नेत्रतपासणी करण्यात आली. तपासणीनंतर गरजू रुग्णांची मोफत नेत्रशस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. तसेच पात्र लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील अनेक गरजू नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवेचा लाभ मिळाला.

यावेळी आयोजकांनी सांगितले की, समाजातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अशा सामाजिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येत असून, भविष्यातही विविध लोकहिताचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले.