
रायगड-अलिबाग(जिमाका) : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता अलिबाग येथील गोपाळवाडी येथील एक्स-ट्रेडवान सोसायटी येथे श्री. सतीश दारप यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यानंतर ९.३० वाजता मुळे (ता. अलिबाग) येथील पाणंद रस्त्याची पाहणी करतील. १०.०० वा. राखीव.१०.५५ वा.जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे आगमन होईल. ११.०० वाजता जिल्हाधिकारी यांच्या समवेत महसूल, मुद्रांक शुल्क व नोंदणी तसेच भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतील. दुपारी १.०० ते १.३० वाजेपर्यंत राखीव कार्यक्रम असून, १.३० वाजता कुरुळ (ता. अलिबाग) येथील माळी समाज हॉलमध्ये राखीव कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी २.३० वाजता मोटारीने सोईंडुसार पुढील प्रवासासाठी प्रयाण करतील.
शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता अलिबाग येथील बी.एस.एन.एल.ऑफिस शेजारी,रेवस बायपास रोड, चेंढरे येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आणि महसूल दिन कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी १२.०० वाजता त्याच ठिकाणी नागरिकांची निवेदने स्वीकारतील. दुपारी १.०० वाजता राखीव कार्यक्रमानंतर १.३० वाजता मोटारीने अलिबाग येथून रत्नागिरीकडे प्रयाण करतील. सायंकाळी ६.०० वाजता रत्नागिरी येथे आगमन होऊन रात्रीचा मुक्काम करतील.





