अमित नाईक यांना पालकमंत्री भरत गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा


अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य तथा मुख्य प्रतोद अमित नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रायगडचे पालकमंत्री तथा रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी त्यांची भेट घेऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी अमित नाईक यांना निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी आमदार महेंद्र दळवी, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांनी अमित नाईक यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

रायगड जिल्ह्यातील विविध विकासकामे, संघटनात्मक उपक्रम आणि जनतेच्या प्रश्नांसाठी अमित नाईक सातत्याने सक्रिय असतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री भरत गोगावले यांच्यासह मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.