सचिन घाडी यांना नाशिक येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्थेच्या वतीने ‘राष्ट्रीय दीपस्तंभ पुरस्कार २०२६’ प्रदान


सोगाव  (अब्दुल सोगावकर) : अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन हरिश्चंद्र घाडी यांना ८ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे शिक्षक दिनानिमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्थेच्या वतीने ‘राष्ट्रीय दीपस्तंभ पुरस्कार २०२६’ हा पुरस्कार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांच्या उपस्थितीत न्युज १८ लोकमत मराठी वृत्तवाहिनीचे वृत्तनिवेदक अमितजी गर्जे, नाशिक रोटरी क्लब अध्यक्ष शिल्पाजी पारख, शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक कार्याध्यक्ष मारुती गोपाळ कुलकर्णी यांच्याहस्ते मोठ्या उत्साहात प्रदान करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व पुरस्कारकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी हे मागील बारा वर्षांपेक्षा जास्त काळ सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा, पर्यावरण, आदिवासी विकास यांसह इतर अनेक क्षेत्रात तन मन धन लावून समाजपयोगी व पर्यावरण संवर्धनाचे महान कार्य करत आहेत. त्यांनी आजपर्यंत विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय व कौतुकास्पद कार्याची अनेक सामाजिक संस्थांनी व विविध माध्यमांच्या वृत्तपत्रांनी दखल घेऊन विविध पुरस्कार देऊन गौरविले आहे. याबाबत नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्थेने सुद्धा त्यांच्या अतुलनीय कार्याची दखल घेत त्यांना ‘राष्ट्रीय दीपस्तंभ पुरस्कार २०२६’ हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश येथील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकूण ६० पेक्षा जास्त पुरस्कारार्थींना पुरस्कार देण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना मार्गदर्शन करत पुरस्कार प्राप्त झालेल्या पुरस्कारार्थींनी आपापल्या क्षेत्रात अधिक जोमाने व सक्षमपणे कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांच्यासोबत दिलिप मोंढे, अनिल अनमाने, किशोर नागावकर, संजय अनमाने, वामन ठकरूळ, सतिश घाडी, अमित सकरे, गितेश ठकरूळ, सुयोग अनमाने, प्रथमेश करमेळे, सुबोध खाडे, करण खाडे आदी मित्रपरिवार उपस्थित होते.