नवी दिल्ली (प्रतिनिधी) : आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी केंद्र सरकारकडून देशभरात मोबाईलवर वाजणाऱ्या आपत्कालीन सायरन प्रणालीची टप्प्याटप्प्याने चाचणी सुरू होणार आहे. या प्रणालीद्वारे भूकंप, पूर, चक्रीवादळ यांसारख्या आपत्तीवेळी नागरिकांना त्वरित इशारा दिला जाईल.
“सेल ब्रॉडकास्ट अलर्ट” तंत्रज्ञानावर आधारित या सुविधेमुळे इंटरनेट किंवा एसएमएसशिवायही अलर्ट मिळू शकतो. चाचणीदरम्यान मोबाईलवर मोठा सायरन वाजत “ही फक्त चाचणी आहे” असा संदेश दिसेल.
ही प्रक्रिया पूर्णपणे प्रायोगिक असून नागरिकांनी घाबरू नये आणि अफवा पसरवू नयेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






