राजेश म्हात्रे यांना पोलीस महासंचालक पदक


अलिबाग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र पोलीस दलातील उत्कृष्ट सेवा आणि कर्तव्यदक्षतेबद्दल रायगड पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश सुचित्रा अनंत म्हात्रे (राजा म्हात्रे) यांना सन 2025 चे प्रतिष्ठेचे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह पदक प्रदान करण्यात आले. नवी मुंबई येथे झालेल्या सोहळ्यात अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंखे यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला.
अलिबाग तालुक्यातील आवास येथील रहिवासी असलेले म्हात्रे गेली 31 वर्षे पोलीस सेवेत कार्यरत असून सध्या वाकण येथील महामार्ग पोलीस मदत केंद्रात कार्यरत आहेत. त्यांच्या प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ सेवेमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.