पुढच्या वर्षभर सोना खरेदीच्याबर सोना खरेदी करू नका. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्या देशाला हे आवाहन केले. आता तुम्ही म्हणाल तसंही सोन्याचे भाव इतके वाढले आहेत की सोनं खरेदी करण्याची आमची ताकदच नाही आहे. पण तरीही आम्ही आमच्या पैशानं केले थोडं सोनं खरेदी. तरतच मोदींचा थोडा कशाला? म्हणजे आमच्या घरामध्ये लेकीबाळीचं लग्न असेल तर तिच्या अंगावर काही सोनं न घालताच तिला पाठवायचे? घरात नवा पाहुणा आला तर त्याच्यासाठी काही दागिन्याच नाही करायचं? आम्ही देवाला नवस केला असेल तर तो फेडायचा असेल तर सोनं घ्यायचंच नाही. आता का सोनं खरेदी करायचं की नाही हे सरकार का ठरवते? याचं उत्तर आहे डॉलर. तुमच्याकडे सोनं खरेदी करायला रुपये असतील पण सरकारकडे सोनं खरेदी करायला डॉलर कमी आहेत. अख्ख्या भारताला सोन्याची प्रचंड हौस. शुभकार्यात तर सोनं हवंच ना पैसे जमवायच्या घोमीनही आपण सोनं खरेदी करतो. आता हे सोनं येतं कुठून? ते सोनं येतं परदेशातून. भारताला दरवर्षी किमान सातशे टन सोनं लागतं. त्यातलं भारतातल्या खाण्यामधून किती येतं? जेमतेम एक ते दोन टन म्हणजे आपण वापरतो ते जवळपास सगळंच सोनं आपण आयात करतो. या सोन्याच्या खरेदी होते ते डॉलरमध्ये. आपण रुपयात देऊन डॉलर घेतो. युद्धामुळे रुपयाची किंमत कमी झाली आहे. युद्धापूर्वी जो डॉलर नव्वद ते एक्याण्णव रुपयाला मिळायचा तो आता पंच्याण्णव ते शहाण्णव रुपयेमधून घ्यावा लागला. शिवाय सोन्याचे भाव वाढलेत त्यामुळे सोनं आयात करण्याचा खर्च प्रचंड झाला. दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आपण सातशे पंचावन्न टन सोनं घेतलं त्यासाठी पैसे किती दिले? अठ्ठावन्न बिलियन डॉलर आणि दोन हजार पंचवीस-चौवीसमध्ये आपण सातशे एकवीस तर म्हणजे थोडंसं कमीच सोनं घेतलं पण पैसे किती द्यावे लागलेत? बहात्तर बिलियन डॉलर कारण सोन्याचे भाव वाढलेत. आता तुम्ही म्हणाल की आम्ही पैसे तर देतो आहे ना? मग सरकारनं डॉलरच घ्यावेत की. पण देशाला डॉलर घ्यायचे असतील तर काय सहज विकत नाही घेता येत. ते साधारण तीन मार्गांनी कमावावे लागतात. पहिला व्यापार तुम्ही डॉलरमध्ये माल विका आणि मग त्या डॉलरमधून तुम्हाला हवाय तो माल विकत घ्या. नसरा म्हणजे डॉलरमधून भारतात येणारी रक्कम तोडून आणि तेच तर परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी कमावून पाठवलेले डॉलर आणि ह्यात सगळ्यात नाही भागलं तर मग डॉलरचं सर्जन. आता यातला सगळ्यात मोठा वाटा आहे तो व्यापाराचा. पण युद्धामुळे तेलाच्या किंमती भरमसाट वाढल्यात. त्या तुलनेमध्ये आपली स्मेरियात वाढलेली नाहीय. म्हणजे आपल्याकडे येणारा डॉलर नाही वाढला पण तेल महागल्यामुळे आपल्याला खर्च करावा लागणारा डॉलर वाढला. त्यामुळे कच्च्या तेलावर तर देशाचा जगणारा उज्बुज म्हणजे त्याची आयात कमी करणं आपल्याला शक्य नाही आहे. म्हणजे तिथे डॉलरचा खर्च कमी करता येत नाही आहे. पण सोन्याचं तसं नाही. नाही खरेदी केलं सोनं तरी जगू शकतो. त्यामुळे जागतिक बाजार स्थिर होईपर्यंत सोणं न खरेदी करण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला आहे. त्यानंतरच सोन्याच्या कंपन्यांचे शेअर्स मात्र घडघडले. अर्थात अशा आवाहनानं काहीच फरक नाही पडला तर मग सोन्यावर आयात शुल्क लावणं किंवा त्याच्या आयातीवर निर्बंध लावणं हा तो उपाय सरकार करू शकतं पण त्यामुळे सोन्याच्या किंमती आणखी वाढण्याचा धोका आहे. शिवाय अचानक जर असं उपाय केले तर लोकं नाराज होऊ शकतात तोही धोका आहे. त्यामुळे आधी आवाहन करून पहू, बघ कठोर पावलं टाकू असा सरकारचा विचार असू शकतो.






