मुंबई (प्रतिनिधी): नीट परीक्षेचा पेपर फुटला आणि देशभरातल्या बावीस लाख पोरांच्या मेहनतीची राखरांगोळी झाली. पण यातली संतापाची बाब ही आहे की या पोरांच्या मेहनतीची राखरांगोळी करणारे दोन मास्टरमाइंड हे प्राध्यापक आहेत. टी व्ही कुलकर्णी आणि मनिषा गुरुनाथ मांडरे. दोघेही महाराष्ट्रातले. नोटांच्या काही बंडलांसाठी हे दोघांनी फक्त आपला इमान नाही, शिक्षक की पेशाचा सन्मान पण विकला आहे. टीव्ही कुलकर्णी हा रसायनशास्त्राचा प्राध्यापक. नागपूरच्या दयानंद कॉलेजमधनं तो निवृत्त झाला आहे. नागपूर आणि पुण्यामध्ये वेगवेगळ्या कोचिंग क्लासेशी संबंधीत आहे. नीटच्या रसायनशास्त्राचे प्रश्न सेट करण्याशी त्याचा थेट संबंध होता. म्हणूनच प्रश्नपत्रिकेतील प्रश्न त्याला माहीत होते. हेच प्रश्न त्यानं विकले. एप्रिल महिन्यात त्यानं काही विद्यार्थ्यांना पुण्यामधल्या आपल्या घरी विशेष कोचिंगसाठी बोलावलं. तिथं त्यांना गेस्ट पेपरच्या स्वरूपात काही प्रश्न दिले. ते प्रश्न या विद्यार्थ्यांना लिहायला लावले. त्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून घोटून घेतली. हे सगळं करताना त्याच्या सोबत होती मनिषा वाग्मारे. ही बाई आहे ब्युटी पार्लरवाली. पार्लरचं काम सोडून ती प्राध्यापकांना इथं गिरायके मिळवून देत होती. याच मनिषा वाग्मारेचा फोन तपासला तेव्हा आणखीन एक प्राध्यापक कापटी. तिचं नाव मनिषा मांढरे. पुण्यातल्या कॉलेजमध्ये ती बॉटनीची प्राध्यापक आहे. तिच्याकडेही नीटच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याचं काम होतं. हे काम गुप्त असल्यामुळे कॉलेजलाही त्याची पुरेशी माहिती नव्हती. मनिषा मांढरेचा सुद्धा पॅटर्न सेम. परीक्षेच्या काही दिवस अगोदर काही मुलांना पुण्यातल्या घरी बोलावलं. त्यांच्यासोबत प्रश्न शेअर केलेत. त्यांच्याकडून उत्तरं गोठवून घेतली. आता हे सगळे प्रश्न बाहेर विकण्याची जबाबदारी ब्युटी पार्लरवाल्या मनिषाची होती. लाखो रुपयांना हे प्रश्न विकले गेले. मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यात ते फारसं कचरीही नव्हतं. सीबीआयनं आता या सगळ्यामध्ये अनेकांना ताब्यात घेतलं आहे. पण खरे प्रश्न पुढे आहे. ज्यांनी प्रश्नपत्रिका सेट करायच्या, तेच जर पेपर फोडणार असतील तर त्यांना आवरायचं कसं? अहो कायदा गुन्हा रोखू शकतो. पण या प्राध्यापकांना भसन्या झाल्या आहेत. त्याला कसं रोखायचं? पेपर फुटला. परीक्षा पुन्हा द्यावी लागणार. या टेन्शनमध्ये आज देशभरात तीन विद्यार्थ्यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. काय अवस्था तर होईल त्यांच्या आईवडिलाची. बावीस लाख पोरं. तोच जीवघेळा मनस्ताप सहन करत पुन्हा हात पुस्तकं उघडत आहेत. लाखो पालक आपल्या पोरांचीही अवस्था बघून आतमध्ये चिअरते तुटतात. गरिबीशी लढत पोरांना शिकवण्याचं स्वप्न बघारे कितीतरी पालक. आज सगळ्याच्या नळ्या परीक्षेसाठी परत पयपय जमा करतात. पण एक प्रश्न तो पेपर विकत घेणाऱ्यांनापण विचारायला हवा. ही प्रश्नपत्रिका विकत घेऊन तुम्ही मेडिकलला ॲडमिशन मिळवालो. पण तुमची बोौगीक लायकीच नसेल तर तुम्ही डॉक्टर कसं बनणारात? आणि तिथंही लांडालबाड्या करून तुम्ही बनलातच डॉक्टर तर या समाजासाठी तुम्ही त्या प्राध्यापकांपेक्षा सुद्धा जास्त धोखादायक आहात. देश म्हणून आपल्याला हे सडके प्राध्यापकही नको आहेत आणि हे सडके डॉक्टरही नको आहेत.





