
सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रसूती विभागाच्या डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे नवजात बालकांचा बळी
आरोपी डॉ प्रियल शेंडे अजूनही अटक नाही???
अलिबाग पोलीस ठाण्या बरोबरच जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या प्रयत्नांना यश
पीडित सुष्मिता काटले यांनी मानले पोलिसांचे आभार
अलिबाग(प्रतिनिधी): अलिबागचा जिल्हा रुग्णालयामध्ये प्रसूती विभागामध्ये डॉ प्रियल शेंडे ह्या सन २०२२साली डॉ म्हणून कार्यरत होत्या, त्याच दरम्यान बेलोशी ता अलिबाग येथील सुष्मिता रुपेश काटले यांना प्रसूती करिता दाखल करण्यात आले होते, डॉ प्रियल शेंडे या प्रसूतीच्या वेळी हजरच न राहिल्यामुळे सुष्मिता काटले यांच्या बाळाला जीव गमवावा लागला त्या वेळी अलिबाग पोलिसांनी आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती मात्र सुष्मिता काटले डॉ प्रियल शेंडे यांच्या विरुद्ध तक्रार दिली होती,
सदरच्या तक्रारी मध्ये त्यांनी नमूद केले आहे की,मी09 महीन्याची गरोदर असल्याने दि. 14/05/2022 रोजी माझ्या पोटात कळा येत होत्या म्हणून माझे पती रुपेश काटले यांनी मला अलिबाग सौव्हील हॉस्पीटल येथील प्रसुती गृह येथे पहाटे 04.00 वा दाखल केले होते.
मला सीव्हील हॉस्पीटल येथे पहाटे 04.00 वा अॅडमिट केले त्यावेळी माझ्यावर कोणतेच उपचार करण्यात आले नाहीत तसेच दुपारी 02.00 या सुमारास डॉक्टर फुटाणे साहेब है तेथे हजर झाले व त्यानी मला तपासले त्यावेळी माझी तब्बेत ठिक होती मला रात्री 09.00 वा च्या सुमारास प्रसुती होण्यासाठी नर्सने एक इंजेक्शन दिले होते त्यावेळी पर्यंत माझी तब्बेत ठिक होती व मला थोड्याथोड्या प्रसुती कळा येत होत्या परंतु दि.15/05/2022 रोजी रात्री साधारण 02.00 या ते 03.00 वा च्या सुमारास मला जास्तच प्रसुती कळा चालु झाल्या त्या वेळी मला त्रास होत असुन डॉक्टरला बोलवा असे सांगितले परंतु सदरवेळी ऑन ड्युटी डॉक्टर प्रियल रविंद्र शेंडे या हॉस्पीटल येथे उपस्थीत नव्हत्या व त्या वेळी मला जास्तच त्रास होत असल्याने तेथे उपस्थीत असलेल्या ऑन ड्युटी नर्स यांनी डॉक्टर प्रियल रविंद्र शेंडे यांच्या मोबाईलवर फोन केला परंतु डॉ. प्रियल रविंद्र शेंडे याने भी सकाळी येईन त्याना थांबवुन ठेवा असे उत्तर दिल्याचे नर्सने मला सांगितले तसेच साधारण 03.00 वा च्या सुमारास जन्म घेण्याच्या ठिकाणातुन बाळाचे डोके अर्धवट बाहेर आले होते परंतु पुर्ण बाहेर येत नव्हते त्या वेळी सुद्धा डॉ. प्रियल यांना स्टाफ नर्स यांनी फोन केला होता परंतु डॉ. प्रियल शेंडे सदर वेळी सुद्धा हॉस्पीटल येथे आल्या नाहीत व साधारण सकाळी 06.30 वा च्या दरम्यान स्टाफ नर्स यांनी माझी नॉरमल डिलीव्हरी केली परंतु बाळाला माझे पासुन लगेच दुसरी कडे घेवुन गेले व मी वारंवार विचारणा करून सुद्धा माझे बाळ कोठे आहे या बाबत मला सांगितले नाही. संध्याकाळी 06.00 वाच्या दरम्यान माझे पती रुपेश काटले यांनी मला सांगितले की आपले बाळ डिलीव्हरी होताना प्रसुती होण्याच्या जागी त्याचे डोके अडकुन होते तरी योग्य वेळी डॉक्टर यांनी सिजर न केल्यामुळे आपले बाळ दगावले आहे.
दि.14/05/2022 रोजी पहाटे 04.00 या ते दि. 15/05/2022 रोजी पहाटे 06.30 वा दरम्यान मौजे सिव्हील हॉस्पीटल अलिबाग येथे माझी प्रसुती होत असताना वारंवार नर्स यांना माझ्या अंगात ताकद नसुन मी बाळाला पुश करु शक्त नसले बाबत सांगितले व माझी सिजर करा अशी विनंती केली होती परंतु सदर वेळी ऑनडयुटी डॉक्टर प्रियल शेंडे तेथे उपस्थीत नसल्याने माझे सिजर होवु शकले नाही तसेच माझी प्रसुती होत असताना प्रसुती होण्याच्या ठिकाणी बाळाचे डोके बराच वेळ अडकुन राहील्याने माझे बाळ दगावल्याची माझी खात्री असुन डॉक्टर त्यांच्या कर्तव्यावर हजर नसल्याने त्यांच्या निष्काळजीपणा मुळे व येळेत त्यांनी माझ्यावर सिजर न केल्या मुळे माझे बाळ दगावले असुन माझी डॉक्टर प्रियल शेंडे यांच्यावर योग्यती कायदेशीर कारवाई होण्यास विनंती केली होती. सदर बाबत अलिबाग पोलीस ठाणे अकस्मात मृत्यु नौद क्र.33/2022 अन्वये सी.आर.पी.सी. कलम 174 अन्वये दाखल होता. सदर अकस्मात मृत्युचे चौकशी कामी पोलीसानी मयत बालकाचे उपचाराचे कागदपत्र यांचे तन समीती मार्फत अवलोकन होवुन स्पष्ट अभिप्राय मिळणेबाबत मा.अधिष्ठाता (डिन) सर जे. जे. हॉस्पीटल मुंबई यांचे कडे पत्रव्यवहार केला होता दि.27/07/2026 रोजी जे. जे. हॉस्पीटल मुंबई यांचे कडून तज्ञ समितीचा अहवाल अलिबाग पोलीस ठाणे येथे प्राप्त झाला. सदर अहवाल आज रोजी आम्हाला पोलीसांनी दाखवला सदर अहवालामध्ये डॉक्टर प्रियल शेंडे यांनी त्यांचे कर्तव्यात नेमलेले असताना डिलीव्हरीच्या वेळी हजर राहणे आवश्यक असताना सुद्धा कर्तव्यावर हलगर्जीपणा व निष्काळजीपणा करुन जाणीवपुर्वक गैरहजर राहील्या व अनउपस्थीत राहील्यामुळे आवश्यक उपचार वेळेवर न मिळाल्याने माझे डिलीव्हरी दरम्यान माझे नवजात बाळाचा मृत्यु झाला असल्याने माझी डॉक्टर प्रियल रविंद्र शेंडे यांच्या विरोधात कायदेशीर तक्रार आहे.
सदरच्या तक्रारीच्या अनुषंगाने तसेच
सर. जे. जे. समूह रुग्णालय मुंबई, पाच तज्ञ डॉक्टरांच्या समितीच्या अहवालाने डॉ प्रियल शेंडे यांना कर्तव्यावर हलगर्जी पणा व निष्काळजी पणा करून जाणीव पूर्वक अनुपस्थित राहिल्यामुळे आवश्यक उपचार न मिळाल्याने नवजात बाळाच्या मृत्यूस जबाबदार ठरविल्या बाबतचा लेखी अहवाल वरिष्ठ पोलिस निरीक्षक अलिबाग यांना सादर करण्यात आल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रसूती विभागाच्या डॉ, प्रियल रविंद्र शेंडे यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०४-Aअंतर्गत गुन्हा अलिबाग पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे,
डॉ प्रियल शेंडे यांच्या मनमानी व हलगर्जी पणामुळे माझी व माझ्या बाळाची कोणतीही चुकी नसतानाही मी माझं बाळ गमावलं आहे, माझ्या प्रमाणे अशा कित्येक मातांना या डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे आपली बालके गमवावी लागली आहेत, शासनाने अशा डॉक्टरांवर कडक कायदे करणे आवश्यक आहे, मला माझ बाळ तर मिळू शकत नाही पण जे,जे, हॉस्पिटलच्या वरिष्टतज्ञ डॉक्टरांचे , अलिबागचे पोलिस अधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक आंचल दलाल यांचे आभार मानते की, प्रियल शेंडे या डॉक्टरच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात मला मदत केली
सौ, सुष्मिता काटले पीडित (फिर्यादी)
जन्माच्या अगोदरच कित्येक कोवळ्या जिवांना डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत, सर्व सामान्यांच्या बालकांच्या जीवाला किंमत आहे की नाही?सरकारने या विषयाची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे
अँड राकेश नारायण पाटील सामाजिक कार्यकर्ते




