31 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सहाय्यक अधीक्षक मानसी भायदे सेवानिवृत्त


अलिबाग (प्रतिनिधी) : जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग येथे कार्यरत मानसी मनीष भायदे, सहाय्यक अधीक्षक, जिल्हा न्यायालय रायगड-अलिबाग या श्रीवर्धन, मुरुड, पेण न्यायालय, जिल्हा न्यायालय अलिबाग, फॅमिली कोर्ट तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे सेवा बजावत 31 वर्षे 2 महिने 27 दिवसांची प्रदीर्घ व उल्लेखनीय शासकीय सेवा पूर्ण करून सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झाल्या.

यावेळी आयोजित निरोप समारंभात जिल्हा न्यायाधीश-1 . श्रीमती सुनीता तिवारी, प्रबंधक मनीषा बद्रिके, अधीक्षक सुशील चाचे, अनिस दळवी तसेच कोर्ट मॅनेजर महेशप्रसाद दायमा यांच्यासह न्यायालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मान्यवरांनी आपल्या मनोगतात मानसी भायदे यांनी सेवाकाळात प्रामाणिकपणा, शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि सहकार्याची भावना जपत न्यायालयीन कामकाजात दिलेल्या मोलाच्या योगदानाचा गौरव केला. त्यांच्या पुढील आयुष्यास उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

समारंभात त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण निरोप देत त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.