अलिबाग (प्रतिनिधी):अलिबाग तालुक्यातील वरंडे गावातील उत्साही, तडफदार आणि सुदृढ शरीरयष्टीचा तरुण कु. सर्वेश सुभाष पाटील याचे आकस्मिक अपघातात गंभीर दुखापत झाल्यानंतर उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अत्यंत कमी वयात सर्वेशने जगाचा निरोप घेतल्याने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मित्रपरिवार, नातेवाईक आणि गावकऱ्यांमध्ये तो आपल्या मनमिळावू स्वभावामुळे आणि उत्साही व्यक्तिमत्त्वामुळे ओळखला जात होता. त्याच्या जाण्याने गावाने एक होतकरू, उमदा तरुण गमावला आहे.
ही घटना अत्यंत वेदनादायक असून, त्याची उणीव कधीही भरून न येणारी आहे. संपूर्ण वरंडे गाव आज या दुःखद प्रसंगात पाटील कुटुंबाच्या दुःखात सहभागी झाले आहे.
ईश्वरचरणी प्रार्थना की, दिवंगत सर्वेशच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्याच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो.






