हर्षला नाईक या डॉक्टर ऑफ फिलाॅसाॅफी पदवीने सन्मानित


कार्लेखिंड ( सुनिल बुरुमकर ) : अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा या खेडेगावातील हर्षला संदीप नाईक यांना डॉक्टर ऑफ फिलाॅसाॅफी पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.
शिक्षणाची आवड, मेहनत आणि जिद्द याच उत्तम उदाहरण म्हणजे हर्षला संदीप नाईक. त्यामुळेच आज डॉ. हर्षला म्हणून आपले स्वतःचे नाव समाजात प्रस्थापित करून कुटुंब आणि गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. डॉ. हर्षला यांच्याशी संपर्क साधला असताआ त्यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासाची माहिती दिली. परहूरपाडा अशा खेडेगावातील अंगणवाडी, प्राथमिक शाळा, तसेच कोकण एज्युकेशन सोसायटी हायस्कूल, परहूर येथे उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. शिक्षणाची आवड असल्यामुळे पुढील शिक्षणासाठी अलिबाग शहराकडे धाव. बरं अलिबाग शहराकडे जाण्यासाठी वाहनांची सोय नाही. कधी चालत तर कधी वाहनाने असा प्रवास केला. कारण घरातील आर्थिक स्थिती तशी बेताची. वडील,आई आणि दोन लहान भाऊ.अलिबाग मधील जे.एस.एम. काॅलेज मध्ये बी.एस.सी., एम.एस्सी माॅलिक्युलर बायोलाॅजी आणि बायको जेनेटिक्स शिक्षण झाले. शिक्षणाची आवड होतीच म्हणून बारावीला सायन्स घ्यायचे आणि शिक्षक व्हायचं हे ठरविले होते. बी.एस.सी. च्या निरोप समारंभामध्ये शिक्षक डॉ.मिश्रा सर, प्रिती फाटे आणि मिनल म्हात्रे यांनी नेट-सेट बद्दल माहिती दिली. पुढील शिक्षण मुंबईत घेत असताना शिक्षणाबाबत अधिक माहिती मिळाली. नेट झाल्यावर काॅलेजमध्ये प्रोफेसरसाठी पीएचडी असणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने पीएचडी साठी प्रवेश घेतला.
Simple and Sensitive Optical Biosensing Method for Detection of SARS-COV-2 spike Antigens या विषयावर निबंध प्रबंध लिहिला.
हा विषय निवडण्याचा कारण म्हणजे, मुळात एम.एस्सी. बाॅटनीमध्ये ( वनस्पती शास्त्र) झाल्यामुळे कोविड विषाणूच्या संदर्भातील ( SARS-COV-2) घटकावर काम करणे हे नवीन होते. पण काहीतरी समाजाला चांगलं द्यायचं या हेतूने या विषयाची निवड केली.
डॉ. हर्षला यांना डॉ. राजेश राऊत यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. तसेच राजीव गांधी सायन्स आणि टेक्नॉलॉजी कडून प्रकल्प मंजूर करून आर्थिक सहाय्य मिळवून दिल्यामुळे पीएचडी पूर्ण करता आली. पीएचडी करताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. बाॅटनीची पार्श्वभूमी असतानाही कोरोना विषाणूच्या स्पाईक अँटीजेन्सच्या तपासणी साठी ऑप्टिकल बायोसेंन्सिंग पद्धतीवर संशोधन करणे हा एक समृद्ध अनुभव होता. या संशोधना दरम्यान आत्तापर्यंत अकरा प्रबंध आणि पुस्तकामध्ये आठ बुक चॅप्टर लिहीले. आई-वडीलांचे आशिर्वादामुळेच मला शक्य झाले. भविष्यात अजून नवीन काही शिकता यावे आणि समाजाला छान काही देता येईल अशीच अपेक्षा आहे.
डॉ. हर्षला यांनी नवीन तरुण वर्गासाठी आदर्श निर्माण केला आहे.