शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग शहरातील युवा नेतृत्व आणि सहकारी मित्र श्री. मनीष पेरेकर यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त शिवसेना नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते ॲड. संदीप पालकर यांनी मनीष पेरेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या शुभेच्छा सोहळ्याला शिवसेना नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते ॲड. संदीप पालकर, शिवसेना शहरप्रमुख विकास कर्नेकर, वैभव नाईक यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहकारी मित्राच्या वाढदिवसानिमित्त उपस्थितांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. स्नेह, मैत्री आणि संघटनात्मक एकजुटीचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमात आनंदी वातावरण पाहायला मिळाले. मनीष पेरेकर यांना निरोगी, आनंदी आणि यशस्वी आयुष्य लाभो, अशा सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
आत्मीयतेने पार पडलेल्या या वाढदिवस सोहळ्यामुळे मैत्रीचे आणि सहकाऱ्यांमधील जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ झाले.









