मुंबई (प्रतिनिधी): एकसिस वयाच्या त्रीशा शर्मा पेशाने मॉडेल अभिनेत्री दिसायला कमालीची सुंदर. पुणेही पाहात राहावं असं सौंदर्य. त्रीशाचा तोच सुंदर चेहरा गेले सात दिवस भोपालच्या शवागारात पडून आहे. सात दिवसांपूर्वी त्रीशानं गळफास लावून घेतला. आणि त्यामागची जी कारणं समोर येत आहेत ती भयंकर आहेत. त्रीशा मूळची दिल्लीची. दिल्लीमध्ये आणि पुण्यामध्ये तिचं शिक्षण झालं. दिसायला सुंदरच होती त्यामुळे अगदी तरुण वयातच ती मॉडेलिंगकडे वळली. चांगलं यशही तिला मिळालं. चांगल्या ब्रँडच्या जाहिरातीही मिळाल्या. मिस पुणे स्पर्धेमध्ये ती पहिली आली. मग काही चित्रपटांमध्ये त्रीशानं काम केलं. हळूहळू एमबीएचं शिक्षणही पूर्ण केलं. दिल्लीत चांगली नोकरी मिळाली. भाऊ सैन्यामध्ये मेजर झाला. अगदी स्वप्नातला म्हणावा असं त्रीशाचं आयुष्य होतं. मग त्रीशानं लग्न करण्याचा निर्णय घेतला. मॅट्रीमोनीयल साईटवर नोंदणी केली. भोपालमधला एक मुलगा तिला आवडला. दिसायला हँडसम, पेशानं वकील. त्याची आई भोपालमध्ये न्यायाधीश म्हणून काही दिवसांपूर्वी निवृत्तच झाली होती. घरची आर्थिक परिस्थितीही चांगली. त्यामुळे सगळं जुळून आलं. सहा महिन्यांपूर्वी दोघांनी लग्न केलं. सुरुवातीच्या काही दिवस बरं गेले. पण मग मात्र त्रीशा आईवडिलांकडे सासरच्यांच्या छळाविषयी सांगायला लागली. सासू सतत बोलायची, नवरा हळूहळू हातही उचलू लागला होता. आईवडील सबुरीनं घ्यायचं सांगत होते. पण तेव्हाच त्रीशानं गळफास घेतला. लग्नाच्या तिसऱ्या महिन्यामध्ये त्रीशा प्रेग्नंट होती. सगळ्यांना वाटलं आता सगळं ठीक होईल. पण तसं काहीच झालं नाही. त्रीशाचा नवरा समोरख त्यानं त्रीशाच्या पोटातलं मूल कोणाचं आहे असं तिला विचारायला सुरुवात केली. त्रीशासाठी हे सगळंच कठीण होतं. दोन एक महिने तिनं वाट बघितली. समजावून सांगितलं. पण काहीच फरक पडला नाही. शेवटी प्रेग्नन्सीच्या दुसऱ्या महिन्यात त्रीशानं गर्भपात करून घेतला. पण तरीही त्रीशाचा छळ थांबत नव्हता. 12 मेच्या मंगळवारी त्रीशानं आईला फोन केला. रड-रड रडली. म्हणाली या नरकामध्ये राहणं मला सहन होत नाही आहे. एकतर तुम्ही मला घ्यायला या, नाहीतर मी तुमच्याकडे परत येते. तिनं दिल्लीचं तिकीटही बुक केलं. आणि मग तिनं मैत्रिणींना मेसेज केला. म्हणाली लग्न करून मी तर फसलीच आहे. जाळ्यातच अडकली आहे. तू नको लग्न करू. साडेदहाला त्रीशा फोन उचललेला म्हणून तिच्या आईनं सासूगीरीबाला यांना फोन केला आणि त्रीशा कुठे आहे ते जरा बघा असं सांगितलं. सासूंनच त्रीशाच्या आईला पुन्हा फोन केला आणि सांगितलंच त्रीशानं गर्भपात घेतला आहे. त्यांनी स्वतःहच त्रीशाला हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यामुळे सगळे महत्त्वाचे पुरावे नष्ट झाल्याचा आरोप आता कुटुंबीय करतात. त्रीशाचा नवरा या घटनेनंतर फरार झाला. जज असलेली सासू आता माध्यमांमध्ये सांगते की त्रीशा म्हणजे नशा करायची. ती चांगली सून नव्हती. पोस्टमार्टम करणारे डॉक्टर्स सांगत आहेत की पोलिसांनी गळफास घेतलेला पट्टा अहानालच दिलाच नाही. त्रीशाच्या आईवडिलांची आता मागणी आहे की हे पोस्टमार्टम दिल्लीमध्ये पुन्हा व्हावं आणि हा तपास भोपालच्या बाहेर न्यायावा. ही मागणी तोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मुस्तक देहावरच राहात आहे. त्यामुळे सात दिवस झालेत त्रीशाचा मुस्तक देत हा शवागारातच आहे. मृत्यूनंतरही त्रीशाला ना न्याय मिळतोय आणि ना शांती.





