संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रशांत नाईक यांच्याकडून विनम्र अभिवादन


अलिबाग शहर नाभिक समाज संघटनेच्यावतीने पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन; महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन

अलिबाग (प्रतिनिधी): संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अलिबाग शहर नाभिक समाज संघटनेच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या पुण्यतिथीनिमित्त अलिबाग नगर परिषदेचे वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांनी संत सेना महाराज यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी अलिबाग नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे तसेच संजना किर यांनीही संत सेना महाराजांना अभिवादन केले.

संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त रुपेश मनोहर इंदुलकर, रा. मेटपाडा कोळीवाडा, अलिबाग यांच्या निवासस्थानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वाजता संत सेना महाराज यांच्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा, सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पोथी वाचन, तर दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून संत सेना महाराज यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याला अभिवादन करण्यात आले. संत सेना महाराजांनी समाजाला दिलेली समता, सेवा, भक्ती आणि बंधुभावाची शिकवण आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.

अलिबाग शहर नाभिक समाज संघटनेच्यावतीने आयोजित या पुण्यतिथी कार्यक्रमास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत सेना महाराजांचे आशीर्वाद तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला. अलिबाग शहर नाभिक समाज संघटना व सर्व समाज बांधव-भगिनी यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.