पीएनपी सायरस पूनावाला स्कूल नागावच्या गार्गी नाईकची सुवर्ण कामगिरी  


अलिबाग (प्रतिनिधी): पीएनपी सायरस पूनावाला स्कूल, नागाव अलिबाग येथील सिनियर केजी (Sr. KG) वर्गातील विद्यार्थिनी गार्गी नाईक हिने सुवर्ण, अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे.

६ सप्टेंबर रोजी नागपूर येथील ग्रामीण पोलीस मुख्यालयात ७ वी राज्यस्तरीय लाठी-काठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पीएनपीच्या लहान आणि प्रतिभावान खेळाडू गार्गी नाईक हिने तिचे उत्कृष्ट कौशल्य आणि जिद्दीने रौप्य पदक (Silver Medal) – द्वि-लाठी (Double-Stick), सुवर्ण पदक (Gold Medal) – द्वि-अणिका खेळ (Dvi-Anika) पटकावले. राज्यस्तरावरील तिच्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे तिला वापी ( गुजरात ) येथे होणाऱ्या राष्ट्रीय लाठी काठी स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. इतक्या लहान वयात तिचा आत्मविश्वास, समर्पण, शिस्त आणि कठोर परिश्रम खरोखरच प्रेरणादायी आहेत. तिच्या या यशामुळे संपूर्ण पीएनपी संस्थेला अत्यंत अभिमान वाटत आहे.

या उत्कृष्ट कामगिरी बद्दल संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका गीतिका भूचर, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी गार्गी नाईक हिचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.