शिवसेना नेत्यांच्या टीकेला सुनील तटकरे यांचे महत्त्व देणे टाळले


“कसले गौप्यस्फोट? कुणाच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचे, हे आपण ठरवायचे नाही, जनता ठरवेल!”

अलिबाग (प्रतिनिधी) : शिवसेनेच्या नेत्यांकडून होत असलेल्या टीकेला आणि गौप्यस्फोटांच्या दाव्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी फारसे महत्त्व देणे टाळले आहे. टीकाकारांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याऐवजी त्यांनी आपल्या कामाचा दाखला देत या टीकेकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका स्पष्ट केली.

यावेळी बोलताना सुनील तटकरे म्हणाले, “कसले गौप्यस्फोट आणि कुणाच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचे? सोडून द्या. माझे काम काय आहे, हे रायगड, महाराष्ट्र आणि देशाला माहीत आहे. त्यामुळे कुणाला काय बोलायचे आहे, ते बोलू द्या. त्याचा मला काहीही फरक पडत नाही.”

पुढे ते म्हणाले की, अशा टीकांवर माझी प्रतिक्रिया शून्य असेल. कारण माझे कामच बोलत असते. माझ्या कामाचे मूल्यमापन मी किंवा तुम्ही करणार नाही, तर जनता करेल. जनतेला सर्व काही माहीत असून योग्य वेळी तीच आपला निर्णय देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, टीकाकारांबाबत बोलताना तटकरे यांनी हात जोडून परमेश्वराकडे प्रार्थना केली. टीका करणाऱ्यांना वाकडाई लाभो आणि परमेश्वराने त्यांना क्षमा करावी, अशा आशयाची प्रार्थना करत त्यांनी उपरोधिक शैलीत आपल्या भावना व्यक्त केल्या.

एकूणच, राजकीय आरोप-प्रत्यारोपांना प्रतिउत्तर देण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची भूमिका सुनील तटकरे यांनी घेतल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट झाले.