खोपोली -दिनकर भुजबळ:महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यंदाही रायगड जिल्ह्यातील करियर कोचिंग क्लासेस च्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करत घवघवीत यश संपादन केले आहे.
कॉमर्स शाखेतून अनिष्का यादव हिने ९३.१७% गुणांसह संपूर्ण खालापूर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. विज्ञान शाखेतून श्रेयश कदम याने ९०.५०% गुण मिळवत मुलांमध्ये अव्वल स्थान मिळवले.
तसेच जनता विद्यालय, खोपोली येथून सिद्धांत देशमुख याने ९२.३३% गुणांसह कॉमर्स विभागात प्रथम क्रमांक मिळवला, तर आर्या भारती हिने ९०.३३% गुणांसह द्वितीय क्रमांक पटकावला. आनंद शाळेतील उज्वला चव्हाण हिने ८५.५०% गुणांसह कॉमर्स शाखेत प्रथम क्रमांक मिळवला.
ध्रुवी पोरवाल हिने ९२.५०% गुणांसह गगनगिरी कॉलेजमधून कॉमर्स विभागात द्वितीय स्थान मिळवले. आयुष सिंग याने ८९.१७% गुण मिळवून वसंतराव देशमुख कॉलेजमधून द्वितीय क्रमांक मिळवला. विज्ञान शाखेत रोनित आंग्रे याने आनंद शाळेतून ८१% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला, तर साक्षी सिंग हिने वसंतराव देशमुख कॉलेजमधून ८०% गुण मिळवून मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. बंसरी मजेठिया ही विद्यार्थिनी कॉमर्स विभागातून मुलींमध्ये द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
खोपोलीमधील विविध शाळांच्या गुणवत्ता यादीत करियर कोचिंग क्लासेस चे विद्यार्थी यंदाही वर्चस्व गाजवताना दिसून आले. दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत क्लासेसने यशाची परंपरा अखंड ठेवली आहे.









